Close

The guardian minister of Ratnagiri Hon’ble Udayji Samant reviewed various development works in Ratnagiri district

रत्नागिरीचे पालकमंत्री मा.ना.उदयजी सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा घेतला आढावा
रत्नागिरी दि. 07 : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला.
. या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधूरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य श्री किरण सामंत आणि विविध खात्याचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी विविध विकासकामांची अधिकारी वर्गाकडून माहिती घेतली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा सिंधुरत्न समृध्द योजना आढावा, न. प. रत्नागिरी अंतर्गत मंजूर कामांचा व नविन प्रस्तावित कामांचा आढावा, जि. प. रत्नागिरी अंतर्गत मंजूर कामांचा व नविन प्रस्तावित कामांचा आढावा, म. जि. प्रा. व ग्रा. पा. पु. जि. प. रत्नागिरी अंतर्गत मंजूर कामांचा व नविन प्रस्तावित कामांचा आढावा, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड अंतर्गत मंजूर कामांचा व प्रस्तावित कामांचा आढावा, पत्तन व खार जमीन विभाग रत्नागिरी आढावा घेतला.
सार्वजनिक बांधकाम विभाग यंत्रणा म्हणून मंजूर झालेल्या व नविन प्रस्तावित कामांचा आढावा, ग्रोयन्स पध्दतीचा बंधारा बांधणे व गाळ काढणे कामाचा आढावा, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, हातवली टोल संदर्भात, सुरक्षा रक्षक मंडळ संदर्भात चर्चा करुन त्याविषयीं माहिती घेण्यात आली आहे. सर्व कामांबाबत पालकमंत्री यांनी तात्काळ कामे मार्गी लावण्याचे आदेश बैठकीत अधिकाऱ्यांना दिले आहेत.