Close

राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी केले जनता दरबार चे आयोजन

रत्नागिरी दि ५/६/२०२३ जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपण कटिबद्ध असून याचे परिणाम नागरिकांना लवकरच दिसून येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वारस नोंदीचा प्रश्न लवकरच निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वारस नोंद लावण्याबाबत दिनांक 12 ते 30 जून या कालावधीत तहसीलदारांच्या सहायाने एक विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. आयोजित ‘जनता दरबारामधे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व अन्य जिल्हा स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेल्या तक्रारदारांच्या अडचणीची सोडवण्यासाठी पालकमंत्री महोदयांनी आस्थेने विचारपूस केली. जिल्ह्यातील सुमारे पन्नासहून अधिक अर्जदारांनी या जनता दरबारात आपल्या तक्रारी मांडल्या. त्यातील 35 हून अधिक तक्रारींची दखल पालकमंत्र्यांनी तात्काळ घेत जागेवरच तक्रारदारांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. नागरिकांची प्रकरणे निकाली काढून संबंधित विभागाने तक्रारदारांना न्याय द्यावा, असे निर्देशही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.