Close

मान्सून काळातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत चिपळूण तालुक्याचा आढावा

श्री.एम देवेंदर सिंह जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,श्री.धनंजय कुलकर्णी पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांनी मान्सून काळातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत चिपळूण तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी अधिकारी उपस्थित होते. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वाशिष्टी व शिव नदीमधील गाळ काढण्याच्या कामाचा सुद्धा यावेळी आढावा त्यांनी घेतला. आणि मान्सून काळात सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना केल्या.