Close

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग

शासकीय विभागाचे नाव :- नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग
मंत्रालयीन विभाग :- नगर विकास विभाग
भौगोलिक कार्यक्षेत्र :- रत्नागिरी महसूली जिल्हा संपूर्ण
उपलब्ध सेवा :- भाग नकाशा, झोन दाखले, बिनशेती/बांधकाम परवानगी इत्यादी

विशिष्ट कार्य :-

i. रत्नागिरी जिल्हयातील सर्व नगर परिषदा/नगरपंचायती यांच्या क्षेत्रांच्या नियोजनबध्द विकासाच्या अनुषंगाने विकास योजना तयार करणे व सदरच्या विकास योजनांच्या अंमलबजावणीबाबत नगर परिषदा/नगरपंचायती यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे.
ii. रत्नागिरी जिल्हयातील महसूल विभागाकडून प्राप्त होणा-या भूसंपादन निवाडा प्रकरणाची तांत्रिक छाननी व मूल्यांकनाबाबत अभिप्राय देणे.
iii. रत्नागिरी जिल्हयातील नागरी क्षेत्रातील शासकीय जमिनी अथवा मालमत्ता भाडेमूल्याने हस्तांतरीत करतेवेळी त्रिसदस्यीय समितीचे सदस्य म्हणून कामकाज पाहणे व मूल्यांकन प्रकरणी अभिप्राय सादर करणे.
iv. रत्नागिरी जिल्हयातील सर्व विकसनाचे प्रस्ताव जसे की बांधकाम/बिनशेती परवानगी, रेखांकन परवानगी, भोगवटा परवानगी इत्यादी प्रकरणांबाबत संबंधित महसूल विभागास अभिप्राय देणे.
v. रत्नागिरी जिल्हयातील नागरी क्षेत्रांच्या विकास योजनेतील आरक्षणे विकसित करण्याकरीता नगर विकास-6अ या योजनेअंतर्गत मा.जिल्हाधिकारी यांच्या कडून जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उपलब्ध करुन देणे.
vi. रत्नागिरी जिल्हयातील नागरी क्षेत्रांच्या हद़दीतील मिळकतींच्या मालमत्ता कराची आकारणी बाबत प्राधिकृत मूल्यनिर्धारण अधिकारी या नात्याने कामकाज पाहणे तसेच दर यादी तपासणे व दर ठरविणे.

रत्नागिरी जिल्हयातील विकास योजनांची सद्यस्थिती

I. रत्नागिरी जिल्हयातील रत्नागिरी नगर परिषद, राजापूर नगर परिषद, चिपळूण नगर परिषद व दापोली नगरपंचायत या शहरांच्या विकास योजना शासनाकडून मंजूर झालेल्या असून अंमलात आलेल्या आहेत.
II. मंडणगड नगरपंचायत, देवरुख नगरपंचायत, गुहागर नगरपंचायत, लांजा नगरपंचायत या शहरांची विकास योजना नव्याने तयार करण्याचे काम या कार्यालयाच्या स्तरावर सुरु असून सदरच्या विकास योजना हया अत्याधुनिक भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) वर आधारीत तयार करण्याकरीता मे.टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा.लि. ठाणे या खाजगी संस्थेची नेमणूक शासन स्तरावरुन करण्यात आलेली आहे.
III. खेड नगर परिषदेची विकास योजना सुधारीत करण्याची प्रक्रिया देखील वर नमूद प्रक्रियेप्रमाणे या कार्यालयाच्या स्तरावर सुरु आहे.
IV. रत्नागिरी नगर परिषदेच्या आजुबाजूच्या गावांना विकास संभाव्यता असल्याने एकूण 40 गावांचा झोन प्लॅन तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

राबविण्यात येणा-या योजना

I. नवि 6 (अ) योजना – सदर योजनेतून जिल्हयातील नगर परिषद हद़दीतील मंजूर विकास योजनेतील आरक्षित व सार्वजनिक विकास कामांना नवि – 6(अ) योजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते. संबंधित नियोजन प्राधिकरण ही कामे विकसित करते.
II. एकात्मिक शहर विकास योजना – या योजनेद़वारे नगर परिषद क्षेत्रातील विशिष्ट कामांना केंद्र शासन व राज्य शासन यांच्या सहभागातून अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये नगर परिषदेच्या आर्थिक स्थितीस चालना मिळावी असे प्रकल्प जसे दुकानकेंद्र, सांस्कृतिक सभागृह, रस्ते इत्यादी हाती घेतले जातात. या कामांना केंद्र/राज्य या दोघांकडून अर्थसहाय्य उपलब्ध होते. सदरची एकात्मिक शहर विकास योजना, रत्नागिरी जिल्हयामधील नगर परिषदांची पूर्ण झालेली आहे.

विविध समित्या – खालील नमूद समित्यांवर सहायक संचालक, नगर रचना हे सदस्य असतात.

I. कांदळवन संरक्षण समिती
II. MCZMA अनधिकृत बांधकाम निर्मूलन समिती
III. त्रिसदस्यीय मूल्यांकन समिती

पर्यटन बृहत आराखडा रत्नागिरी