Close

जिल्हा कोषागार कार्यालय

जुन्या मुंबई राज्यातील कोषागारे महसूल विभागाकडून वित्त विभागाने दिनांक 01 एप्रिल 1955 पासून आपल्या नियंत्रणाखाली आणली. त्याचप्रमाणे महसूल विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली विदर्भातील कोषागारे वित्त विभागाने दिनांक 01 जानेवारी 1958 पासून आपल्या नियंत्रणाखाली आणली. महाराष्ट्र शासनाने वित्त विभागाच्या नियंत्रणाखाली 1 फेब्रुवारी 1962 पासून लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना केली आणि कोषागाराचे तात्काळ नियंत्रण संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडे विभागप्रमुख या नात्याने सोपविण्यात आले. कोषागाराप्रमाणेच तहसिल स्तरावरील 24 उपकोषागारांचा एक गट दिनांक 1 एप्रिल 1964 रोजी आणि दिनांक 1 जून 1968 रोजी 98 उपकोषागारांचा आणखी एक गट वित्त विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्यात आला. आता राज्यातील सर्व कोषागारे/उपकोषागारे वित्त विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असून संचालक लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई या विभागप्रमुखांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत.
रत्नागिरी जिल्हयाकरीता रत्नागिरी येथे 1 जिल्हा कोषागार कार्यालय आणि जिल्हायातील 8तालुकास्थित प्रत्येक तालुक्यासाठी 1 मिळून 8 उपकोषागार कार्यालये कार्यान्वयीत आहेत.

लेखा व कोषागारे संचालनालयाच्या अधिनस्त यंत्रणेचे ध्येय

१ सर्व शासकीय जमा रकमा शासन खाती जमा होण्याकरीता योग्य लेखाशिर्षाचा वापर होतो आहे,किंवा नाही हे तपासून जमा रकमा शासकीय लेख्यात योग्यप्रकारे दर्शविणे.
2 शासनाच्या विविध उपक्रम/योजना इत्यादिंच्या खर्चाकरीता लागणाऱ्या रकमा खर्चाकरीता वेळेवर उपलब्ध करून देणे.
3.जमा रकमांचे लेखांकन योग्य तऱ्हेने व्हावे या करीता आवश्यक ती सर्व माहिती योग्य विहित मुदतीत महालेखाकार कार्यालयास उपलब्ध करुन देणे.
4. राज्य शासनाच्या तसेच अन्य राज्य शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तीविषयक लाभांचे प्रदान करणे,तसेच मासिक निवृत्तीवेतनाचे (कुटूंबनिवृतीवेतनासह) प्रदान करणे.

कोषागार कार्यालयाकडून खालील प्रमाणे सेवा पुरविल्याजातात .

1. शासकीय कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या विविध मुख्य लेखाशिर्षाखाली विविध प्रकारची देयके पारित व त्यांचे प्रदान करणे.
2. विविध मुख्य लेखाशिर्षनिहाय जमा होणाऱ्या रकमांचे दैनंदिन स्वरुपात एकत्रिकरण करणे.
3. जमा – खर्चाच्या दैनंदिन यादीसह प्रदानाप्रित्यर्थ प्राप्त झालेली सर्व प्रमाणके व जमा रकमेची चलने यांचा मासिक लेखा विहित दिनांकाला महालेखाकार कार्यालयाकडे सादर करणे.
4. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीविषयक लाभाचे प्रदान करणे,तसेच मासिक निवृत्तीवेतनाचे (कुटूंबनिवृतीवेतनासह) प्रदान करणे.
5. विशिष्ट प्रकारच्या मुद्रांकांची योग्य रक्कम स्विकारुन विक्री करणे.

उपकोषागारे कार्यालयाकडून खालील प्रमाणे सेवा पुरविल्याजातात.

1. ण्तालुका पातळीवर कार्यरत उपकोषागार कार्यालय हे संचालनालयाचे अधिनस्त सर्वात कनिष्ठ कार्यालय आहे.
2. शासकीय कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या विविध मुख्य लेखाशिर्षाखाली विविध प्रकारची देयके पारित व त्यांचे प्रदान करणे.
3. विविध मुख्य लेखाशिर्षनिहाय जमा होणाऱ्या रकामांचे दैनंदिन स्वरुपात एकत्रिकरण करणे.
4. जमा-खर्चाच्या दैनंदिन लेखे ,सर्व प्रमाणके व जमा रकमेची चलने जिल्हा कोषागार कार्यालयास व्यवहारचे दुसऱ्या दिवशी सादर करणे.
5. विशिष्ट प्रकारच्या मुद्रांकांची योग्य रक्कम स्विकारुन विक्री करणे.

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS)

1. आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून पा्रप्त झालेली कर्मचाऱ्यांची माहिती कोषागारामार्फद केंद्रिय अभिलेख देखभाल अभिकरणाकडे पाठविणे आणि त्यांच्याकडून प्राप्त होणारा कायम निवृत्तीवेतन क्रमांक कोषागारामार्फत आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे देणे.
2. आहरण व संवितरण अधिकारी याने सेवा अभिलेखात नोंद ठेवून कर्मचाऱ्यास कळविणे. कर्मचाऱ्यांचे अभिलेखे ठेवणे, त्यांच्या जमा झालेल्या निधीची उपलब्ध करुन देणे.
3. कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले त्याचे स्वत:चे अंशदान व त्यावर देय असलेले सममुल्य/ शासनाने निश्र्चित केलेल्या दराने शासनाचे अंशदान या रकमा कोषागारामार्फत मे.एनएसडिएल ई-गर्व्हनन्स इनफ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांचेकडे पाठविणे.
4. केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण व कोषागार कार्यालये यांचेमध्ये समन्वय साधुन योजनेचे काम पूर्ण करणे.

निवृत्ती वेतन

एप्रिल 2012 पासून निवृत्ती वेतन धारकांना दरमहा मिळालेले निवृत्ती वेतन पहाण्याकरिता संकेतस्थळ पुढील प्रमाणे आहे. https://pension.mahakosh.gov.in

वरील संकेतस्थळावर निवृत्ती वेतन धारकांची माहीती पहाण्याकरीता Username व password खालीलप्रमाणे आहेत
User Name :- PENSIONER
password :- ifms123

निवृत्तीवेतनधारकांनी सादर करावयाचे प्रमाणपत्र डाउनलोड