मा. पालकमंत्र्यांची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट-अत्याधुनिक नियंत्रण कक्ष उभारणार – मा.पालकमंत्री श्री.उदय सामंत : (दि.22 जुलै 2023): मा.पालकमंत्री श्री.उदय सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देवून पाहणी केली. अत्याधुनिक कक्ष उभारणीसाठी आवश्यक निधी दिला जाईल. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यावेळी नियंत्रण कक्षाचे कामकाजाबाबत माहिती दिली.