Close

Job Fare Ratnagiri 2023

जिल्हयातील बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी मा.ना.श्री.उदयजी सामंत, मंत्री, उद्योग तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा यांचे संकल्पनेतून जिल्हाधिकारी श्री.एम.देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या रोजगार मेळाव्यास जिल्हयातील बेरोजगार युवक / युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात 2140 युवक / युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला.