Close

Public awareness about environment friendly Ganeshotsav celebration of district administration through clean, beautiful, green Ratnagiri cycle rally

स्वच्छ, सुंदर, हरित रत्नागिरी सायकल रॕलीमार्फत जिल्हा प्रशासनाची पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा कारण्याबाबत जनजागृती
*रत्नागिरी, दि. ३ (जिमाका) : ‘पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा, स्वच्छ, सुंदर व हरित रत्नागिरी’ हा संदेश घेवून आणि मतदार जनजागृतीसाठी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आज सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी श्री एम देवेंद्र सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी अन्य शासकीय निमशास्त्रीय विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि नागरीक, विद्यार्थी यांनी या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.