जिल्हाधिकारी श्री.एम देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांनी राजापूर तालुक्यातील धोपेश्वर खंडेवाडी व गुरववाडी येथील दरड प्रवण ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली व तेथील रहिवाश्यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिने तात्पुरत्या स्थलांतरणासाठी त्यांचे मतपरिवर्तन केले.