Close

शासकीय विभागीय ग्रंथालय,रत्नागिरी

कार्यालयाचीस्थापना

भारताचे थोर सुपुत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मरणार्थ दि.1 ऑगस्ट, 1963 रोजी रत्नागिरीचे रहिवासी आणि महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री मा. स्व. बाळासाहेब सावंत यांच्या शुभहस्ते या इमारतीच्या पायाभरणीचा समारंभ होऊन दि. 1 मे, 1972 रोजी भारताचे अर्थमंत्री मा. स्वयशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. याच ठिकाणी दि.20 ऑक्टोबर, 1976 रोजी कोंकणवासीयांकरीता महाराष्ट्र शासनाव्दारे शासकीय विभागीय ग्रंथालय, रत्नागिरी सुरु करण्यात आले.कोंकण विभागातील शहरी तथा ग्रामीण भागातील जनतेमध्ये वाचनाची आवडनिर्माण व्हावी, वाचनसंस्कृती जोपासली जावी, ग्रंथ व इतर वाचन साहित्य उपलब्ध करुन देणे व मुख्यत्वे संदर्भ ग्रंथालय म्हणून हे ग्रंथालय स्थापित करण्यात आले आहे. शासकीय विभागीय ग्रंथालय, रत्नागिरी हे कार्यालय सध्या लोकमान्य टिळक स्मारकमंदिर, खारेघाट रोड, रत्नागिरी येथे कार्यरत आहे.

ग्रंथालयातील ग्रंथसंपदा

ग्रंथालयातील एकूण ग्रंथसंपदा:- 1,12,310
दैनिके:- 22
साप्ताहिके:- 59
मासिके:- 21
त्रैमासिके:- 02

ग्रंथालयीन लाभार्थी

सर्वग्रंथप्रेमी, पुरुष, महिला, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक-युवती, अभ्यासक, संशोधक, शालेय विद्यार्थी व बालवाचक ग्रंथालयाचा लाभ घेऊ शकतात.

ग्रंथालयीन वाचक संख्या

नोंदणीकृत व्यक्ति सभासद:- 60
संस्था सभासद:- 49
नियमित वाचक:- दररोजसरासरी 225 ते 250
अभ्यासक :- 50 पेक्षाअधिकअभ्यासक
संशोधक:- 10

कार्यालयाची वेळ:- (सोमवार ते शुक्रवार)

कार्यालयीन वेळ:- सकाळी 9.30 ते सायं. 06.15
ग्रंथदेवघेव व वाचनकक्ष वेळ:- सकाळी 10.00 ते सायं. 05.45
(दर शनिवार, रविवार व शासकीय सुट्टिच्यादिवशी कार्यालय बंद राहिल)

ग्रंथालयीन सेवा व उपक्रम:-

ग्रंथदेव-घेव
* ग्रंथप्रदर्शन आयोजन करणे
* विषयानुसार वृत्तपत्र कात्रण सेवा
* लेखक व वाचकांच्या मागणी नुसार माहिती सेवा पुरविणे
* संदर्भ सेवा देणे
* विविध विषयांवरती व्याख्यानांचे आयोजन करणे
* स्पर्धा परीक्षा विषय कमार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करणे
* स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचन कक्ष

व्यक्ति सभासद

(एका वेळी एक पुस्तक 15 दिवसांसाठी वाचनासाठी देणे)
1. विहित नमुन्यातीलअर्ज
2. अर्जासोबत जोडवयाची कागदपत्र – स्वत:चा फोटो, ओळखपत्र, पत्याचा पुरावा (आधारकार्ड)
3. विहीत नमुन्यातील अर्ज 10/-, अनामत रु.500/- व दरदोन वर्षासाठी वर्गणी रु.100/-

संस्था सभासद

(दरमहा ग्रंथसंच घरी वाचनासाठी देणे)
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. संस्था नोंदणी अधिनियम, 1860 वा सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 नुसार असणारी संस्था नोंदणी प्रमाणपत्राची छायाप्रत
3. संस्था सभासदासाठी मागणी बाबत कार्यकारी मंडळाच्या ठरावाची प्रत
4. विहीत नमुन्यातील अर्ज 25/-, अनामत रु.2500/- व दरदोन वर्षासाठी वर्गणी रु.750/-