Pradhan Mantri Formalisation of Micro food processing Enterprises (PMFME)
“एक जिल्हा एक उत्पादन” या धर्तीवर ही योजना राबविली जाणार असुन रत्नागिरी जिल्हयासाठी “आंबा” या पिकाची निवड करण्यात आली आहे.
Beneficiary:
शेतकरी
Benefits:
आंबा आधारीत व इतर फळपिक आधारीत प्रक्रिया युनिटला (नाविन व जुने प्रकल्प) प्रकल्पा खर्चाच्या 35 टक्के जास्तीत जास्त अनुदान रक्कम रूपये 10.00 लाख मिळते.
How To Apply
असा करा अर्ज:- वैयक्तीक तसेच गट लाभार्थी https://pmfme.mofpi.govi.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून शकतील.
आवश्यक कागदपत्रे:- वैयक्तिक लाभार्थी/फर्म
*पॅन कार्ड (संबंधित लाभार्थी/फर्म असल्यास सर्व प्रमोटर)
*आधारकार्ड व फोटो (सर्व प्रमोटर/गॅरंटर)
*पत्ता- दोन महिन्याच्या आतील, लाईट बिल, फोनबील, पाणी पोस्ट पेड, मोबाईल फोन बील किंवा
मालमत्ता कर/नगरपालिकेचा कर भरलेली पावती
रेशनकार्ड (वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी)
*बँक पासबुक किंवा स्टेटमेन्ट (मागील 6 महिन्याचे)
*उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र
*पार्टनरशीप अॅग्रीमेंन्ट
वैकल्पिक (Optional):-
*शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
*चालु कर्जाचे कर्ज मंजुरी पत्र
*चालु कर्जाचे स्टेटमेंन्ट
अधिक माहितीसाठी संपर्क:- कृषि सहाय्यक/कृषि पर्यवेक्षक/मंडळ कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी/उपविभागीय कृषि अधिकारी अथवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.