Close

Covid19- Kruti Dal

Publish Date : 28/05/2020

ग्रामीण भागातील कृती दल

ग्राम / वाडी कृती दलाची रचना

अध्यक्ष -सरपंच/ वाडीतील ग्रामपंचायत सदस्य

सदस्य – तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील़, अध्यक्ष तंटामुक्ती किंवा जेष्ठ सदस्य, कृषी सहाय्यक, शिक्षक/मुख्याध्यापक, आरोग्य सेविका, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, गावातील/वाडीतील 5 स्वयंसेवक,

ग्राम/वाडी कृती दल यांच्या जबाबदाऱ्या

आलेले प्रवासी Containment zone मधून आले नसल्यास त्यांना स्वगृही अलगीकरण (Home quarantine) करावे.

आलेले प्रवासी Containment zone मधून आले असल्यास व त्यांचे राहते घर स्वतंत्र / विलग (Isolated) असल्यास त्यांना स्वगृही अलगीकरण (Home quarantine) करणेस अनुमती दृयावी, नसल्यास गावातील जिल्हा परिषद शाळा, समाज मंदिर, मंगल कार्यालये इ. ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण (Institutional quarantine) करुन ठेवणेत यावे.

आलेल्या प्रवाशांना (Containment Zone किंवा Non Containment Zone मधून आलेले) घरात राहणेसाठी पुरेशी व्यवस्था नसेल, त्यांची जि.प. शाळा, समाजमंदीर, मंगल कार्यालय ई. ठिकाणी व्यवस्था करावी

संस्थात्मक अलगीकरण (Institutional quarantine) असलेल्या लोकांची बिछाना, भोजन, पाणी, शौचालय व अन्य नित्याच्या गरजांची व्यवस्था कृती दलाने संबंधिताच्या नातेवाईक, सामाजिक संस्था, तरुण मंडळ, महिला मंडळ, बचत गट, दानशूर व्यक्ती यांचे मदतीने करावी.

अलगीकरण (Quarantine) करणेत आलेल्या व्यक्ती गावात/वाडीत/शहरात कोठेही अनावश्यक फिरणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी. अशा व्यक्ती अलगीकरणातून बाहेर पडल्यास नजीकच्या पोलीस ठाणेस कळविणेत यावे.

अशा व्यक्तींच्या आरोग्याची नियमित तपासणी व आरोग्य सेतू ॲप मधील नोंद झाली आहे याबाबत खात्री करावी.

अलगीकरण केलेल्या कोणत्याही व्यक्तीस कोरोना विषाणू सदृश्य लक्षणे दिसून आल्यास तात्काळ जवळच्या शासकीय दवाखान्यात तपासणीस पाठवावे.

अलगीकरण (Quarantine) असणाऱ्या ठिकाणी वेळोवेळी निर्जतुकीकरण करावे.

वरील सर्व बाबतीत कोणतीही शंका अथवा अडचण असल्यास संबंधित तहसीलदार यांचेशी संपर्क करावा.

स्वगृही अलगीकरण (Home Quarantine) केलेल्या व्यक्तींच्या / कुटुंबांच्या जबाबदा-या

अलगीकरण केलेल्या व्यक्तींनी कोणत्याही परिस्थितीत घराच्या बाहेर जावू नये.

स्वत:चे घरामध्ये सामाजिक अंतर ठेवून सर्व व्यक्तींनी रहावे.

कुटुंबातील सर्वांनी मास्क, सॅनिटायझर व हात धुण्याचा साबण याचा नियमित वापर करावा.

आजारी व्यकतीने स्वगृही सुध्दा अनावश्यक एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फिरणे टाळावे.

आजारी व्यक्तींचे कपडे घरगुती डिटर्जंट व ड्रायचा वापर करुन वेगळयाने स्वच्छ करावेत. शौचालय वारंवार Bleach solution/phenolic disinfection निर्जतुक करावेत.

घरातील वारंवार स्पर्श होणारे बेड, टेबल इ. पृष्ठभाग वांरवार स्वच्छ व निर्जतुक करावा.

कुटुंबियांनी घरात गरोदर महिला, वय वर्षे 10 खालील मुले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व मतिमंद व्यक्ती व दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती यांचे बाबतीत विशेष दक्षता घ्यावी.

कुटुंबातील कोणत्याही सदस्यास कोरोना विषाणू सदृश्य लक्षणे दिसून आल्यास तात्काळ जवळच्या शासकीय दवाखान्यात तपासणीस पाठवावे.

आपल्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य सेतू ॲप मध्ये नोंदणी करुन घ्यावी.

ग्राम/वाडी कृती दलाने दिलेल्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावे.

अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हयातील नियंत्रण कक्षात खालील क्रमांकावर संपर्क साधावा. फोन नं. 02352 – 226248

शहरी भागातील कृती दल

शहरी कृती दलाची रचना

अध्यक्ष -संबंधित प्रभागाचे नगरसेवक

सदस्य -तलाठी, आरोग्य सेवक, आशा वर्कर, स्वच्छता मुकादम, पोलीस कर्मचारी, प्रभागातील 5 स्वयंसेवक, कर निरीक्षक / कर लिपिक

नागरी कृती दल यांच्या जबाबदाऱ्या

आलेले प्रवासी Containment zone मधून आले नसल्यास त्यांना स्वगृही अलगीकरण (Home quarantine) करावे.

आलेले प्रवासी Containment zone मधून आले असल्यास व त्यांचे राहते घर स्वतंत्र / विलग (Isolated) असल्यास त्यांना स्वगृही अलगीकरण (Home quarantine) करणेस अनुमती दृयावी, नसल्यास गावातील जिल्हा परिषद शाळा, समाज मंदिर, मंगल कार्यालये इ. ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण (Institutional quarantine) करुन ठेवणेत यावे.

आलेल्या प्रवाशांना (Containment Zone किंवा Non Containment Zone मधून आलेले) घरात राहणेसाठी पुरेशी व्यवस्था नसेल, त्यांची जि.प. शाळा, समाजमंदीर, मंगल कार्यालय ई. ठिकाणी व्यवस्था करावी

संस्थात्मक अलगीकरण (Institutional quarantine) असलेल्या लोकांची बिछाना, भोजन, पाणी, शौचालय व अन्य नित्याच्या गरजांची व्यवस्था कृती दलाने संबंधिताच्या नातेवाईक, सामाजिक संस्था, तरुण मंडळ, महिला मंडळ, बचत गट, दानशूर व्यक्ती यांचे मदतीने करावी.

अलगीकरण (Quarantine) करणेत आलेल्या व्यक्ती शहरात कोठेही अनावश्यक फिरणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी. अशा व्यक्ती अलगीकरणातून बाहेर पडल्यास नजीकच्या पोलीस ठाणेस कळविणेत यावे.