Close

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

कृषि व पदुम विभागाच्या कृषि आयुक्तालय पुणे व विभागीय कृषि सहसंचालक कोकण विभाग ठाणे यांचे अधिपत्त्याखाली जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रत्नागिरी हे कार्यालय कार्यरत आहे. सदर कार्यालयामार्फत कृषि विषयक ध्येय-धोरण, अंमलबजावणी व शेतक-यांना शेतीच्या कामासाठी आर्थिक व वस्तु स्वरुपात मदत देण्याचे प्रामुख्याने काम करण्यात येते. त्यासाठी रत्नागिरी जिल्हयामध्ये 3 उपविभागीय कृषि अधिकारी 9 तालुका कृषि अधिंकारी यांचा समावेश केलेला असून त्यांच्या मार्फत केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचे कामाच्या विभागणी प्रमाणे विविध योजनांच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कामे करण्यात येतात.

रत्नागिरी जिल्हयामध्ये कृषि विभागामार्फत राबविण्यात येणा­या विविध योजना

विस्तार योजना:-

*राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत (NMSA)
*कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम (RAD)
*उन्नत शेती-समृध्द शेतकरी मोहिमेंतर्गत कृषि उन्नती योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण
*प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY )
*गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

फलोत्पादन योजना:-

*महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लावगड योजना
*फलोत्पादन पिकांवरील रोग किडींचा सर्व्हेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप आंबा)
*एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
*प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना
*आंबा निर्यातीसाठी मँगोनेट नोंदणी:- www.apeda.gov.in/

कृषि विभागाच्या सर्व योजनांच्या सविस्तर माहितीसाठी
http://www.http//krishi.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आपले सरकार महा-डीबीटी पोर्टल