Close

जिल्हा सांख्यिकी कार्यालय

जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून जिल्हयाची सांख्यिकी विषयक आकडेवारी गोळा करणे व शासनास सादर करणे, मुख्यालयाच्या सूचनेनुसार शासनाच्या विविध योजनांचे मुल्यमापन करणे. पाहणी व गणना, जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, तालुका निवडक निर्देशक प्रकाशन प्रकाशित करणे. केंद्र शासनाने सोपविलेली कामे. उदा. जनगणना, जन्म-मृत्यू नोंदणी पाहणी. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी या अर्थसंकल्पिय प्रकाशनाकरिता लागणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची आर्थिक आकडेवारी गोळा करणे, नागरी व ग्रामीण भावसंकलन केंद्रात किंमती संकलन करणे. शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी गणना करणे. मुख्यालयाच्या सुचनेनूसार विविध गणनेत तांत्रिक सहाय्य करणे जसे माहिती संकलित करणा-या प्रगणकांना प्रशिक्षण देणे, माहिती छाननीबाबत मार्गदर्शन करणे इ.कामे केली जातात.

जिल्हा सांख्यिकी कार्यालय यंत्रणेची कार्यालये-
1. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई.- राज्यस्तर
2. सहसंचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, कोकण विभाग, कोकण भवन नवी मुंबई.- विभागीय स्तर
3. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, रत्नागिरी- जिल्हा स्तर

संकेतस्थळ- https://mahades.maharashtra.gov.in/

प्रकाशने- जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून प्रतिवर्षी प्रामुख्याने खालील प्रकाशने प्रकाशित केली जातात.
1. जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन
2. तालुकावार निवडक निर्देशांक