जिल्हाधिकारी श्री.एम देवेंद्र सिंह यांच्या पुढाकाराने तसेच राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या विशेष मार्गदर्शऩुसार आणि उपस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाट्ये सागरी किनारा स्वच्छता अभियान पार पडले. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद पोलिस विभाग आणि इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, भाट्ये सरपंच, ग्रामस्थ, सेवाभावी संस्था, शहरातील नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.