रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण बैठक दि.29.07.2023 रोजी मा.पालकमंत्री मा.ना.श्री.उदय सामंत यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीमध्ये खालीलप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले-
1. सन 2022-23 मध्ये जिल्हा वार्षिक याजनेच्या 271 कोटी, अनुसुचित जाती उपाययोजना 17 कोटी 81 लाख आणि आदिवासी उपाययोजनांतर्गत 112 लक्ष खर्चास मान्यता देण्यात आली.
2. नियोजन समितीचे कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने सर्व समिती सदस्यांना टॅब देण्याचा निर्णय.
3. लांजा, दापोली, खेड व कामथे या ठिकाणी डायलेसिस केंद्र उभारण्याचा निर्णय.
4. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन मदत करण्याचे मा.पालकमंत्र्यांचे निर्देश.
5. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 साठी 300 कोटी, अनुसचित जाती उपाययोजना साठी 14 कोटी आणि आदिवासी क्षेत्र उपायोजनेसाठी 1कोटी 12 लाक्ष इतका अर्थसंकल्पीय नियत्वय मंजूर.
6. जलजीवन मिशन योजनेतील कामे, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील कामे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची कामे दर्जेदार करण्याबाबत मा.पालकमंत्री महोदयांनी आदेश दिले.