Close

Inauguration of Revenue Week in Ratnagiri District in the presence of the Hon. Guardian Minister

दि.०१ ऑगस्ट – महसूल दिनापासून सुरू होणाऱ्या महसूल सप्ताहाचा शुभारंभ मा.मंत्री उद्योग महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा ना.श्री. उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे अल्पबचत भवनात सभागृहात पार पडला.सुरुवातीला मागील आठवड्यात नैसर्गिक आपत्तीमुळे रायगड जिल्ह्यात ईर्शाळवाडी व आज शहापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना दोन मिनीटे स्तंब्धता पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात सन २०२२-२३ या महसूल वर्षांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या कोतवाल पदापासून ते उपजिल्हाधिकारी पदापर्यंतच्या सुमारे कर्मचारी,अधिकाऱ्यांना मा.पालकमंत्री महोदयांचे हस्ते गौरविण्यात आले. महसुल सप्ताहामध्ये जनतेची अधिकाअधिक कामे करून घेण्याचा मानस जिल्हाधिकारी श्री.एम.देवेंदर सिंह यांनी व्यक्त केला. महसूल विभाग म्हणजे शासन व जनता यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा…असे प्रतिपादन करुन मा.पालकमंत्री महोदयांनी दिल्या महसूल कर्मचारी व अधिकारी यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा..त्याची काही क्षणचित्रे..