Close

G20 Mega Beach Cleaning Event

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, जी-20 परिषद या पार्श्वभूमीवर “मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट” उपक्रमांतर्गत मा.ना.श्री.उदय सामंत, मंत्री, उद्योग तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाट्ये समुद्रकिनारा या ठिकाणी रविवार, दि.21 मे 2023 रोजी सकाळी 6 ते 8 या वेळेत समुद्रकिनारा सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाकरिता केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नवी दिल्ली चे उपसचिव श्री.शंकर लाल बैरवा , जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचेसह विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.