रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्यावर आज चिपळूण तालुक्यातील त्यांच्या मुळगावी मोरवणे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत, जिल्हाधिकारी रत्नागिरी श्री. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.किर्तीकिरण पुजार, चिपळूण चे आमदार श्री.शेखर निकम, गुहागरचे आमदार श्री.भास्कर जाधव जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री.श्रीकांत गायकवाड पुष्पचक्र यांनी अर्पण करून मानवंदना दिली आणि परिवाराची भेट घेत सांत्वन केले.