*विकसित भारत संकल्प यात्रेचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ* *रत्नागिरी, दि. 25- केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” या मोहिमेला पालकमंत्री उदय सामंत यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.* यावेळी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, व अन्य विभागांचे प्रमुख उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा ही महत्वकांक्षी योजना देशात राबविली जात आहे. ही मोहीम 26 जानेवारी 2024 पर्यंत चालणार आहे.