Close

सह जिल्हा निबंधक कार्यालय,रत्नागिरी

नोंदणी मुद्रांक विभागाचे,नोंदणी अधिनियम 1908, महाराष्ट्र नोंदणी नियम 1961,महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958,भारतीय मुद्रांक अधिनियम 1899,तसेच विशेष विवाह अधिनियम 1954 नुसार कामकाज केले जाते.

नोंदणी व मुद्रांक विभागाची प्रशासकीय रचना सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे आहे.
महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग
|
सचिव महसूल
|
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक,महाराष्ट्र राज्य पुणे.
|
नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक,कोकण विभाग ठाणे.
|
सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी.
|
|-सह दुय्यम निबंधक/विशेष विवाह अधिकारी.
|- दुय्यम निबंधक तालुका स्तर

सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खालील प्रमाणे सेवा पुरविल्या जातात.
i)नोंदणी झालेल्य दस्ताविषयक अभिलेख दुरुस्तीस परवानगी देणे.
ii)दस्त नोंदणीस सादर करणेसाठी किंवा कबुली जबाब देण्यासाठी झालेला विलंब क्षमापित करणे.
iii)दस्त नोंदणी दरम्यान खोटे निवेदन किंवा तोतयेगीरी संदर्भातील तक्रारी वरील कार्यवाही करणे.
iv)दस्त नोंदणी नाकारण्याच्या आदेशा विरुध्द अपिलावरील कार्यवाही करणे.
v) दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणामध्ये ई-पेमेंट पघ्दतीने भरलेल्या नोंदणी फी चा परतावा देणे.
Vi) नोंदणीझालेल्या दस्तास जादा भरलेल्य प्रकरणामध्ये नोंदणी फी चा परतावा देणे.
vii) मृत्यूपत्राचा सिलबंद लखोटा जमाकरणे,परत घेणे किंवा उघडणे.
viii) दस्ताचे मुद्रांक शुल्काबाबत अभिनिर्णय करणे.
ix) मुद्रांक शुल्काचा परतावा देणे.

सह दुय्यम निबंधक / दुय्यम निबंधक कर्यालयाकडून खालील प्रमाणे सेवा पुरविल्या जातात.
i) दस्त नोंदणी करणे.
ii)दस्ताच्या सुचिची प्रमाणित नक्कल देणे.
iii)दस्ताची प्रमाणित नक्कल देणे.
iv)शोध उपलब्ध करुण देणे.
v) नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करुन घेणे.
Vi)जुना मुळ दस्त नोंदणी पूर्ण करुन परत देणे.
vii) मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे.
viii)दस्त नोंदणी संदर्भात गृहभेट देणे.
ix)विशेष कुलमुखत्यारपत्राचे अधिप्रमाणन करुन देणे.
x) मृत्यूपत्रकर्त्याच्या मृत्युनंतर मृत्युपत्र नोंदणी करणे.

दुय्यम निबंधक कायारलयात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांनी सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे पुर्व तयारी करणे.
1) व्यवहाराच्या अनुषंगाने दस्त तयार करणे(लिहणे)
2) दस्त नोंदणीसाठी दस्त प्रकारानुसार आवश्यक असणारी कागदपत्रे,परवानग्या संकलीत करणे.
3) जर दस्तऐवजाचे मुद्रांक शुल्क मिळकतीच्या बाजारमुल्यांवर अवलंबून असेल (उदा.खरेदीखत),तर त्या
मिळकतीचे मुल्यांकन तपासुन घेणे.
4) दस्तास मुद्रांक अधिनियमानुसार देय असणारे मुद्रांक भरणे.
5) देय नोंदणी फी भरण्याचे पुर्व तयारी करणे.
6) दस्तावर साक्षीदारांसमोर सहया / निष्पादन (Execution) करणे.
7) दस्त नोंदणीसाठी आवश्यक असणारी दस्ताची माहिती पब्लिक डाटा एन्ट्रीव्दारे संगणकावर ऑनलाईन
भरणे.
8) ई-स्टेप इन या सुविधेव्दारे दस्त नोंदणीसाठी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ आरक्षीत करणे.
9) दस्तावर सही केल्यानंतर तो चार महिन्यांच्या आत दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी सादर करणे
आवश्यक आहे.

दस्त नोंदणीसाठी कर्यालयात जातांना पुढील प्रमाणे कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक आहे.
1)योग्य मुद्रांक शुल्क भरलेला व सर्व पक्षकारांनी सहया केलेला मूळ दस्त.
2)ई-पेमेंटव्दारे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरलेली असल्यास त्यासाठीचा पुरावा.
3)दस्ताच्या कबुलीजबाबासाठी हजर राहणा-या सर्व पक्षकारांची छायाचित्रे असलेली ओळखपत्रे.
4)ओळख पटविणा-या व्यक्ती व त्यांची छायाचित्रे असलेली ओळखपत्रे.
5)दस्त प्रकारानुसार आवश्यक पूरक कागदपत्रे.
6)नोंदणी करावयाच्या दस्ताच्या पानांच्या संख्येनुसार,प्रति पान रुपये 20/- या दरान भरावयाची दस्त
हाताळणी शुल्काच रक्कम.
7)दस्त कुलमुखत्यारपत्राच्या आधारे कुलमुखत्यारधारकाने निष्पादित केला असेल किंवा
कुलमुखत्यारपत्राच्या आधारे मूळ कालकाच्या वतीने दस्त नोंदणीस सादर करण्यात येत असेल किंवा
कबुलीजबाब देण्यात येत असेल,तर अशा अधिकाराचे मूळ मुखत्यारपत्र,त्याची सत्य प्रत व
कुलमुखत्यापत्र अस्तित्वात (अंमलात)असल्याबाबतचे विहित नमुन्यातील घोषनापत्र.
8)जर पब्लिक डाट एन्ट्रीपर्यायाचा वापर करण्यात आला असेल,तर त्याव्दारे प्राप्त 11 अंकी सांकेतांक व
नोंदणीपूर्व गोषवा-याची प्रिंट.
9)जर ई-स्टेप इन व्दारे वेळ आरक्षित केल असेल,तर त्याची पावती.
दस्तऐवजातील नमुद मिळकतीचे दस्ताचे प्रकारानुसार मुल्यांकन करणेसाठी आवश्य असल्यास या विभागातर्फे प्रसिध्द केलेल्या वार्षीक बाजारमुल्यदर तक्त्यामध्ये नमुद केलेले दर वापरण्यात येतात.
सदर बाजारमुल्यदर तक्ते सहायक संचालक नगररचना (मुल्यांकन)कोकण विभाग ठाणे येथे तयार करुन मा.नोंदणी महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे.यांचेकडून दर आर्थीक वर्षासाठी प्रसिध्द केलेले असतात.

तसेच या विभागाचे वेबसाईट www.igrmaharashtra.gov.in येथे नोंदणी व मुद्रांक विषयक सर्व महत्वाची माहिती उपलब्ध केलेली आहे.