Close

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुशासन सप्ताह साजरा

मा. श्री. एम. देवेंदर सिंह , जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व शासकीय विभागांमध्ये दि. 19 डिसेंबर ते 24 डिसेंबर2024 या कालावधीमध्ये सुशासन सप्ताह राबविण्यात आला .. या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना ” प्रशासन गाँव की ओर” ही होती. या कालावधीत जिल्ह्यातील नऊ तहसील कार्यालय व पाच उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये एकूण 54 विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली. या मध्ये विविध प्रकारच्या सेवा जनतेला देण्यात आल्या. या मध्ये 7/12, फेरफार, विविध प्रकारचे दाखले , सामाजिक सहाय्य योजना लाभार्थी निवड इ. 2650 प्रमाणपत्रे व सेवा देण्यात आल्या. मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये फेरफार अदालतींचे आयोजन करण्यात आले . विविध योजनांची माहिती देण्यात आली . भूसंपादन विषयक तक्रारींचे निराकरण करण्यात आले .जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागामार्फत मच्छीमारांना नौका नोंदणी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच नॅशनल फिशरीज डिजिटल पोर्टल वर मच्छीमारांच्या नोंदणीची शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये अपघात गत विमा योजना नोंदणी करण्यात आली .समाजकल्याण कार्यालयाकडून शासकीय मुलांचे वसतिगृह येथे विद्यार्थी पालक मेळावा आयोजित करण्यात आला व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. वनविभाग मार्फत वनविभागाच्या विविध योजनांविषयी जनतेला माहिती देण्यात आली. कामगार विभागामार्फत नोंदीत बांधकाम कामगार यांना ओळखपत्रे वितरित करण्यात आली. तसेच बांधकाम कामगारांनबाबत असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शिकाऊ परवाना, वाहन परवाना इ. चे वितरण करण्यात आले. खादी ग्रामोद्योग विभागामार्फत खेड येथे PMEGP ,CMEGP, PM Vishwakarma, मध केंद्र योजना व मधाचे गाव इत्यादी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ राबवत असलेल्या योजनाची माहिती देऊन CMEGP अंतर्गत योजनाचे 16 लाभार्थीचे फॉर्म भरून घेतले.