महसूल विभागाकडून देणेत येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाअधिक माहीती होवून लाभ घेता येईल व शासनाच्या कामकाजाबाबत नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी शासनाच्यावतीने दि.01 ऑगस्ट महसूल दिनांकापासून “महसूल सप्ताह” सुरू करणेत आला आहे. “एक हात मदतीचा” या संकल्पनेच्या माध्यमातून दि.03.08.23 रोजी जिल्हाधिकारी रत्नागिरी श्री.एम.देवेंदर सिंह, यांनी लांजा तालुक्यातील साटवली गावात आयोजित “लोकअदालत” मध्ये नागरिकांना शासकीय योजना, महसूल कार्यपध्दती, पिक विमा योजना, ई-पिक पहाणी, मतदार नोंदणी इ.महत्त्वपूर्ण विषयांबाबत मार्गदर्शन केले.