Close

पर्यटन

रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीपैकी 85% जमीन डोंगराळ आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये उगम पावतात आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात आणि अरबी समुद्रात विलीन होतात.

जिल्ह्यात 167 कि.मी. लांबीचा समुद्र किनारा आहे, ज्यामध्ये अनेक मनोरंम्य  किनारे व किल्ले आहेत. 180 कि.मी. सह्याद्री पर्वतरांगा मध्ये डोंगर, डोंगरी किल्ले, वैविध्यपूर्ण वन्यजीवन आणि निसर्गरम्य सौंदर्य असणारी अनेक ठिकाणे आहेत. जल क्रीडा, नौकाविहार, मासेमारी, पोहणे, कॅम्पिंग साठी आदर्श खाड्यांनी संमृद्ध आहे.

येथील डोंगर दऱ्या, सागरी किनारे, खाडी, नद्या, गरम पाण्याचे झरे, जंगले, पाण्याचा साठा, धार्मिक ठिकाणे पर्यटकांना  व  यात्रेकरूंना मोठ्या प्रमणात व दुरदुरून आकर्षित करतात. हापूस आंबे, काजू , कोकम, नारळ इत्यादि त्यांची गुणवत्ता आणि चव साठी प्रसिद्ध आहेत. वैशिष्ट्यपूर्ण कोंकणी पाककृती, विशेषत: मासे, कोळंबी व समुद्री खाद्यपदार्थांचे मांसाहारी पदार्थ तोंडातून पाणी आणतात.