Close

लोकसेवा हक्क अधिनियम, 2015

महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतीकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015. या कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पादरर्शक, गतिमान व कालवध्द सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरीता महाराष्ट्र सेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. दिनांक 1 मार्च, 2017 रोजी राज्याचे माजी मुख्य सचिव, श्री. स्वाधीन क्षत्रिय यांची राज्याचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या वयाच्या 65 वर्षे दि.25.01.2022 रोजी पूर्ण होवून ते सेवानिवृत्त झाले नंतर राज्य सेवा हक्क आयुक्त, पुणे श्री.दिलीप शिंदे यांनी दि.25.01.2022 ते दि.03.05.2023 पर्यंत राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त, महाराष्ट्र या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला. दि.04.05.2023 रोजी पासून राज्याचे माजी मुख्य सचिव, श्री. मनु कुमार श्रीवास्तव, भा.प्र.से. (से.नि.) यांनी मुख्य आयुक्त, राज्य सेवा हक्क आयोग म्हणून कार्यभार स्विकारला आहे.

या कायद्याअंतर्गत कोणत्या सेवा नागरिकांना प्राप्त करून घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे, ही माहिती आपण “आर.टी.एस. महाराष्ट्र” या मोबाईल ॲप वर किंवा “आपले सरकार वेब पोर्टल” वर पाहू शकता. सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसताना सेवा नामंजूर करण्यात आली तर नागरिक प्रथम/ द्वितीय अपील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व तिसरे आणि शेवटचे अपील आयोगाकडे दाखल करू शकतात.

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे.

वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.

पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो. या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसुचित सेवांची यादी सोबतच्या प्रपत्रात दिली आहे.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :- https://aaplesarkar.mahaonline.gov.in

Title PDF
आपली सेवा आमचे कर्तव्य (महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५) Download
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५, रत्नागिरी जिल्हा अधिसूचना Download
जिल्हा पुरवठा कार्यालय -महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ Download
जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी प्रारूप अधिसूचना – महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ Download
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिसूचीत लोकसेवांची यादी Download
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ योजनांची माहिती Download