मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे कामाची जिल्हाधिकारी रत्नागिरी श्री.एम.देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांचे समावेत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. मान्सून काळात महामार्गावरील आपत्ती निवारणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी आणि ठेकेदार यांना यावेळी त्यांनी दिल्या.