अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांचा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात युवा मतदारांशी संवाद
हातभर प्रश्नाला बोटभर इलाज असा संदेश लिहून स्वाक्षरीत करतानाच देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी युवकांनी मोठया संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सामर्थ्य मताचे युवा मतदारांशी एक विधायक सुसंवाद हा मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आज पार पडला यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,अन्य अधिकारी तसेच दिव्यांग मतदार,युवा मतदार, तृतीयपंथीय मतदार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.