Close

जिल्हाधिकारी रत्नागिरी श्री.एम देवेंदर सिंह व पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची रत्नागिरी शासकीय रुग्णालयाला भेट

जिल्हाधिकारी रत्नागिरी श्री.एम देवेंदर सिंह व पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थापन,औषधसाठा, कर्मचारी व डॉक्टर्स यांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी रुग्णालयातील एनआयसीयु, एनआरएचएम, प्रशासकीय विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दालन, पीसीपीएनडीटी विधी समुपदेशक दालन, स्त्री रुग्ण विभाग, पुरुष रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, भौतिक उपचार, डीईआयसी, फिजीओथेरेपी या विभागांचीही पाहणी करुन माहिती घेतली. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी संवाद साधत उपचाराबाबत विचारपूस केली.