Close

भारतीय प्रजासत्ताक दिन २०२४ ध्वजारोहण

रत्नागिरी, दि.२६ भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी आदींसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम रत्नागिरी येथे मा.पालकमंत्री श्री.उदय सामंत यांचेहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी श्री.एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी श्री.कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी श्री.शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अन्य शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक आणि पत्रकार आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सर्वप्रथम उपस्थितीत स्वांतत्र्य सैनिक त्यांचे कुटुं‍बीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी – कर्मचारी, पत्रकार आणि जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.