Close

महसूल सप्ताह २०२३ – जनसंवाद

महसूल सप्ताहाचा एक भाग म्हणून ‘जनसंवाद’ या संकल्पनेच्या माध्यमातून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री.एम.देवेंदर सिंह यांनी गुहागर तालुक्यातील गिमवी या गावच्या दुर्गम अशा कातकरी-आदीवासी वस्तीवर डोंगर-दऱ्यांतून सुमारे 3 कि.मी.अंतर चालून भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पहीलीच या वस्तीस भेट असल्याने आदीवासी वस्तीने मोठ्या जल्लोषाने त्यांचे स्वागत केले. तेथील कातकरी-आदीवासी बांधवांशी दिलखुलास संवाद साधला, त्यांच्या समस्या, मुलभूत गरजा जाणून घेतल्या. महसूल विभागाकडे असलेल्या विविध योजनांचा लाभ या नागरिकांना देणेत आला. रेशनकार्ड, जमिनीचे 7/12, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखले, उत्पन्नाचे दाखले इ.महत्त्वाचे शासकीय दस्तऐवजांचे वितरण यावेळी करणेत आले. या आदीवासी वाडीतील गुणवंत व उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दुर्गम व आदीवासी वस्तीवरील एक अविस्मरणीय अनुभव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मनमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधला. तसेच मौजे.पालपेणे, ता.गुहागर येथील जीवनज्योती विशेष शाळा या विशेष विद्यार्थ्यांच्या शाळेलाही ‘जनसंवाद ’ संकल्पनेच्या माध्यमातून भेट देवून विशेष विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेसाठी आवश्यक साधनांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना काही उपयोगी सहाय्यक साधनांचे वितरण त्यांनी यावेळी केले.