Close

राजापुर येथील 75 फुटी राष्ट्रीय ध्वजाचे लोकार्पण

रत्नागिरी, दि. 4 राजापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 75 फूट उंच राष्ट्रीय ध्वजाचे लोकार्पण आज करण्यात आले. आणि ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करण्यात आले. या लोकार्पण सोहळयास खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, माजी आमदार हुस्नबानो खलिपे आदी उपस्थित होते.