Close

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. स्वच्छ परिसरामुळे व्यक्तीचे मन आणि विचार देखील स्वच्छ राहतात. या स्वच्छतेमध्ये सातत्य असायला हवे, ते सर्वांनी ठेवावे, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थितांसमवेत व्यसनमुक्तीची शपथ घेतली.तसेच वृक्षारोपणही करण्यात आले.