Close

“#शासन_आपल्या_दारी” या उपक्रमाचा महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थित शुभारंभ.

“#शासन_आपल्या_दारी” या शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचा महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थित रत्नागिरी जिल्हयामध्ये शुभारंभ. —
रत्नागिरी येथील स्व.प्रमोद महाजन क्रिडा संकुल याठिकाणी मा.ना.श्री.उदय सामंत, मंत्री, उद्योग तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा यांचे मार्गदर्शनाने “शासन आपल्या दारी” या सर्व सामान्यांच्या विकासाच्या अभियानाचा रत्नागिरी जिल्हयाचा शुभारंभ आज दिनांक 25 मे 2023 रोजी महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते पार पडला. यावेळी मा.ना.श्री.दादाजी भुसे, मंत्री, बंदरे व खनिकर्म, महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्री.शंभुराज देसाई, मंत्री, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मा.ना.श्री.उदय सामंत, मंत्री, उद्योग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा, मा.आमदार श्री.रविंद्र फाटक, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.प्रविण पवार, रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हाधिकारी श्री.एम.देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.किर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनांच्या जिल्हयातील सुमारे 20552 लाभार्थ्यांना आज मा.मुख्यमंत्री महोदयांचे उपस्थितीत रु.42.58 कोटींचा आर्थिक लाभ प्रदान करण्यात आला. तसेच 37 दिव्यांग लाभार्थ्यांना 3 चाकी स्कुटर, 50 बांधकाम कामगार लाभार्थ्यांना किटचे वाटप, कामगार मंडळामार्फत 7 कामगारांना धनादेश वितरण, 50 लाभार्थ्यांना शेतीची अवजारे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान अंतर्गत 47 बचत गटांना एकूण रुपये 2 कोटी 15 लाखांचे वितरण, 2 लाभार्थ्यांना व्यावसायिक वाहने इत्यादी लाभार्थ्यांना प्रत्यक्षात कार्यक्रमाचे ठिकाणी वितरण करणेत आले. या कार्यक्रमाच्या सुरवातीला “शासन आपल्या दारी” या अभियानाची माहिती मा.मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ.अमोल शिंदे यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्री.एम.देवेंदर सिंह यांनी केले. या अभियान काळात किमान 1 लाख लाभार्थ्यांना लाभ देण्याचा मानस जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांनी व्यक्त केला. राज्याचे मा.उद्योगमंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा श्री.उदय सामंत साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये शासनाच्या योजनांच्या विविध योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटका पर्यंत मिळाला पाहिजे, त्यासाठी शासकीय यंत्रणांनी घरोघरी या योजना पोहचवाव्यात तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या योजनांपासून रत्नागिरी जिल्हयातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली. आपला उद्देश प्रामाणिक असला म्हणजे सर्वबाजूंनी लोक जोडले जातात. “शासन आपल्या दारी” हे अभियान देशात विक्रमी ठरेल, महाराष्ट्राचे उदाहरण देशासमोर राहील. याची खात्री असून हे एक क्रांतीकारी अभियान सुरू झाले आहे, असा दृढ विश्वास महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी व्यक्त केला. #CMOMaharashtra