Close

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा रत्नागिरी

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील भूजलांच्या संसाधनांच्या अन्वेषण, विकास आणि वाढीशी निगडीत आहे. यात मुख्यतः पाणीपुरवठा केलेल्या भूजल स्रोतांचा शोध करणे ,भूजल पातळीसाठी कृत्रिम रिचार्ज प्रकल्प , विशिष्ट अभ्यास संबंधित ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमा अंतर्गत विंधन विहिरी / विहीरी ड्रिलिंग खोदकाम ट्यूबवेलचे ड्रिलिंग, अल्पवहन सिंचन कार्यक्रमा अंतर्गत तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते. भूजल उपस्थिती इत्यादीच्या तांत्रिक साहाय्याने विद्यमान भूजल संसाधनांचे संरक्षण करणे इ. भुजल साठयामध्ये वाढ होईल या दृष्टीने अभ्यासात्मक तसेच पथदर्शी प्रकल्पामधून Aquifer चा अभ्यास करणे .

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची कार्यालये
१. संचालनालय – पुणे येथे राज्य स्तर
२. उपसंचालक – विभागीय स्तरावर – पुणे , कोकण , नाशिक , औरंगाबाद , अमरावती , नागपूर
३ . वरिष्ठ भूवैज्ञानिक व उपअभियंता कार्यालये – जिल्हा स्तर

संकेतस्थळ – https://gsda.maharashtra.gov.in/

कार्यालयाचा पत्ता –
वरिष्ठ भूवैज्ञानिक,
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा,
रत्नागिरी यांचे कार्यालय
कऱ्हाडे ब्राम्हण संघ इमारत,
सदाचार मंदिर, शेरे नाका, झाडगाव, रत्नागिरी ४१५६१२

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ,रत्नागिरी कार्यालयामार्फत पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्था -2015/प्रक्र179/पापु-1 दिनांक 29-11-2017 देण्यात येणाऱ्या सेवा खालीलप्रमाणे –
1.विंधन विहीर सर्वेक्षण
2.पाण्याचे रासायनिक व जैविक पृथ:करण

विंधन विहीर सर्वेक्षण
शासकीय/निमशासकीय तसेच खाजगी संस्था, शेतकरी व खाजगी व्यक्तींना त्यांचे मागणीनुसार पिण्याच्या पाण्या करिता भूजल सर्वेक्षण अगर भूभौतिक सर्वेक्षण करून तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. शासनाच्या धोरणानुसार अनुसूचित जाती/जमातीचे शेतकरी, दारिद्र्य रेषेखालील शेतकरी व 05 एकरापर्यंत जिरायत शेती असणारे शेतकरी व अयशस्वी सिंचन विहिर प्रकरणे याकरिता कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. शासन निर्णय आापना १०९७/प्रक्र १४७ /पापु-१५ दिनांक ३०-०६-१९९९ नुसार प्रतिप्रकरण भूजल सर्वेक्षणासाठी रु. 1000/- व भूभौतिक सर्वेक्षणासाठी रु.1500/- अशी सुधारित शुल्क आकारून सर्वेक्षण करून देण्यात येते. भविष्या मध्ये या दरात बदल होऊ शकतो . सिंचन विहिरी खोदण्यासाठी कर्जाच्या स्वरूपात वित्तीय संस्था मार्फत अर्थसहाय्य दिले जाते. शेतक-यांच्या जमिनीत भूजल उपलब्धता प्रत्यक्ष स्थळ सर्वेक्षण करून सिंचन विहिर खोदण्यासाठी योग्य दाखला देण्यात येतो. सर्वसाधारणपणे उन्हाळा हंगामा अखेर विहिरींना पाणी उपलब्ध राहण्याच्या शक्यता पडताळून दाखला दिला जातो.

पाण्याचे रासायनिक व जैविक पृथ:करण
भूजल उपलब्धता व त्याचे विविध क्षेत्रातील गरज लक्षात घेता भूजल साठ्याचे महत्व अनन्य साधारण आहे. त्यासाठी भूजल गुणवत्ता तपासणे व सनियंत्रित करणे आवश्यक आहे. पाणी पुरवठा विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आपना-1098/प्रक्र361/पापु-15 दिनांक 21/01/1998 व शासन निर्णय संकीर्ण-0117/प्र. क्र 368/पापु-15 दिनांक 28-03-2018 अन्वये प्रयोगशाळेमध्ये पाणी गुणवत्ता तपासणीकरिता विविध शासकीय, निमशासकीय संस्था ,शेतकरी, कारखानदार, सहकारी गृह निर्माण संस्था तसेच स्थानिक संस्था ,खाजगी व्यक्ती कडून पाण्याचे रासायनिक व जैविक पृथ:करण करण्यात येते. पाण्याचे रासायनिक व जैविक अशा 19 घटकांचे परीक्षण केले जाते . जिल्ह्यातील भूजल गुणवत्ता सनियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यात एकूण 5 प्रयोगशाळा (1 जिल्हा प्रयोगशाळा व 4 उपविभागीय प्रयोगशाळा )कार्यान्वित आहेत. प्रयोगशाळेत पाण्याचे खाजगी नमूने तपासणीसाठी आकारावयाचे शुल्क पाणी पुरवठा विभागाकडील शासन निर्णय क्रमांक डबलयू क्यु एम -2019/ प्रक्र49/ पापु-12 दिनांक 12-02-2021 अन्वये निश्चित करण्यात आले आहेत. भविष्या मध्ये या दरात बदल होऊ शकतो.

लोकसेवेचे नाव लोकसेवा उपलब्ध करून सेवा उपलब्ध करून देणा-या प्रथम आपिलीय द्वितीय आपिलीय अधिकारी यांचे
विंधन विहीर /विहीर स्थळ सर्वेक्षण (भुजलीय व भूभौतिक ) 30 दिवस जिल्हा कार्यालयातील कनिष्ठ भूवैज्ञानिक /सहाय्यक भूवैज्ञानिक जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक ,रत्नागिरी विभागीय उपसंचालक ,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा,कोकण भवन ,नवी मुंबई .
पाणी नमुन्यांचे रासायनिक व जैविक पृथ:करण 30 दिवस जिल्हा कार्यालयातील रासायनी जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक ,रत्नागिरी विभागीय उपसंचालक ,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा,कोकण भवन ,नवी मुंबई .