Close

गणपतीपुळे

दिशा
श्रेणी धार्मिक

गणपतीपुळे मुख्यतः भगवान गणपतीच्या जुन्या मंदिरासाठी ओळखले जाते जे मुख्य आकर्षण आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील गणपतिपुळेमध्ये आकर्षक किनारे आहेत. समुद्रकिनारे आणि गणपती मंदिर व्यतिरिक्त गणपती पुळे मध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. गणगुतीपुळे पासून सुमारे 2 कि.मी. मालगुंड हे प्रसिद्ध कवी केशवसुतचे यांचे जन्मस्थान असून गावामध्ये त्यांचे स्मारक आहे. जयगड किल्ला, प्राचिन कोंकण संग्रहालय, आरे वारे समुद्र किनारा हे गणपतीपुळेजवळील इतर आकर्षणे आहेत. गणपती पुळे मध्य राहण्यासाठी मोठ्या संख्येने रिसॉर्ट्स आणि हॉटेल आहेत. तसेच राज्य शासनाचे MTDC चे निवास्थान सुद्धा जवळ उपलब्ध आहे.

जवळचे शहर – रत्नागिरी (25 किमी)

भेट सर्वोत्तम वेळ – सप्टेंबर ते फेब्रुवारी

कसे पोहोचाल? :

विमानाने

जवळचे विमानतळ: मुंबई - छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (343 किमी)

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक: रत्नागिरी (30 किमी)

रस्त्याने

गणपतीपुळे बसस्थानक (0 किमी)