Close

थिबा राजवाडा

दिशा
श्रेणी ऐतिहासिक

थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशच्या(आत्ताचं म्यानमार) थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी १९१० मध्ये करण्यात आली. १९१६ पर्यंत या राजवाड्यात म्यानमारच्या राजा व राणीचं वास्तव्य होतं. आता या राजवाडयात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. या राजवाड्यात थिबाने वापरलेल्या काही गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत.

राजवाड्यात सुंदर बांधकाम छप्पर असलेली तीन मजली रचना आहे. सुंदर कोरीव काम असलेल्या अर्ध-परिमिती लाकडी खिडक्या या संरचनेचे मुख्य आकर्षण आहेत. पहिल्या मजल्यावर संगमरवरी मजल्यासह एक नृत्य कक्ष आहे. राजवाड्याच्या मागच्या बाजूला एक बुद्ध मूर्ती स्थापित केली आहे. ही मूर्ती राजा थिबा यांनी भारतात आणली होती.

या ठिकाणापासून दिसणारे सोमेश्वर नदी खाडी, भाट्ये समुद्र किनारा अतिशय मनमोहक आहेत.. हे ठिकाण सुंदर सूर्यास्तासाठी देखील प्रसिद्ध आहे.

पाहण्यासाठी खुला – सकाळी १०- ते सायंकाळी ५, प्रवेश शुल्क भरून

कसे पोहोचाल? :

विमानाने

जवळचे विमानतळ: मुंबई - छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (343 किमी)

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक: रत्नागिरी (7 किमी)

रस्त्याने

जवळचे बस स्थानक: रत्नागिरी बस स्थानक (1 किमी)